पहिल्या फेरीत पुण्याच्या अर्जुन कढेचे आव्हान संपुष्टात

पुणे – एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत पहिल्या फेरीत पुण्याच्या अर्जुन कढे याला सर्बियाच्या लासलो जेरीकडून 7-5, 7-6(6) असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सर्बियाच्या लासलो जेरीने वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या अर्जुन कढे याचा 7-5, 7-6(6) असा पराभव केला. 1 तास 43 मिनिटे चाललेल्या या सामन्यात अर्जुनने सुरुवातीला सुरेख खेळ केला.

दुसऱ्याच गेममध्ये अर्जुनने जेरीची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतः ची सर्व्हिस राखत 3-0 अशी आघाडी घेतली.पण हि आघाडी अर्जुनला टिकवता आली नाही. सातव्या गेममध्ये जेरीने अर्जुनची सर्व्हिस ब्रेक केली व 4-4अशी बरोबरी साधली. त्यानंतर जेरीने आपल्या बिनतोड सर्व्हिस आणि आक्रमक खेळीच्या जोरावर अर्जुनची पुन्हा 11 व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 असा जिंकून आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले. जेरीने हा सेट अर्जुनविरुद्ध टायब्रेकमध्ये 7-6(6) असा जिंकून विजय मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)