जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा : पंकज अडवाणीने सलग तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद

यांगाव – भारताचा आघाडीचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवानीने गुरूवारी ‘150 अप’ प्रकारांत सलग तिसऱ्यांदा ‘आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. त्याच्या जगज्जेतेपदांची संख्या ही 20 वर गेली आहे.

बेंगळरूच्या 33 वर्षाच्या पंकजने अंतिम फेरीमध्ये  म्यानमारच्या ‘नाय थाय अो’ याचा पराभव केला. त्याने 150 अप प्रकारांत 6-2(150-21, 0-151, 151-0, 4-151, 151-11, 150-81, 151-109, 151-0) असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. याआधी सेमीफायनलमध्ये पंकजने डेविड कोजियर याचा 5-0 (150-73, 152-17, 152-8, 151-4, 157-86) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.

पंकज अडवाणी याचं हे सलग तिसरे विजेतेपद ठरले. याआधी त्याने 2016 मध्ये बेंगळरू आणि आणि मागील वर्षी दोहामध्ये विजेतेपद पटकावले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)