संजीवनीचा बेसबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम

कोपरगाव- संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या बेसबॉल संघाने 13 व्या अखिल भारतीय आंतर अभियांत्रिकी बेसबॉस स्पर्धेत दणदणीत यश मिळविल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्‌सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
या स्पर्धा पुण्यातील एम.आय.टी. अभिमत विद्यापीठात घेण्यात आल्या. मुंबईच्या अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयावर संजीवनीच्या संघाने 13-5 अशा धावांनी दणदणित विजय मिळविला.

कोल्हे म्हणाले, संजीवनीच्या सर्वच संस्थांमध्ये व्यक्तिमत्व विकासावर विशेष लक्ष देण्यात येते. उत्तम शरीरयष्टी हा व्यक्तिमत्वचा एक महत्वाच घटक आहे. खेळाने उत्तम आरोग्य राहते. संजीवनीत सर्व प्रकारच्या खेळांसाठी तज्ज्ञ प्रशिक्षक असल्यामुळे खेळाडू प्रत्येक खेळात विजयश्री खेचून आणतात.

राष्ट्रीय पातळीवरील बेसबॉल स्पर्धेत कर्णधार सागर ढोकणे याच्या नेतृत्वाखाली अतुल पाटील, महेश दुशिंग, मनोज पवार, शंतनू वेताळ, प्रशांत कदम, अमोल जाधव, शुभम आगवन, करण बडोगे, मयूर शिंदे, मोहीत पाटील, परेश सरोदे, निखिल पाटील, हृषीकेश पुंड, मनिष गावडे व वैभव मंडलिक यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून राष्ट्रीय पातळीवर विजयाची नोंद केली. अतुल पाटील यास उत्कृष्ट खेळाडू, तर मनोज पवार यास उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)