बहरीन ओपन मध्ये भारतीय मुलींची चार पदके

मुंबई – भारताच्या युवा टेबल टेनिस पटूंनी बहरीन ज्युनिअर आणि कॅडेट ओपन स्पर्धेत सुवर्णपदक, दोन रौप्यपदक आणि एक कांस्यपदक अशा एकूण चार पदकांची कमाई केली. बहरीनच्या मनामा येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या कॅडेट गटात भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली.

यावेळी टीम इंडिया 2 मध्ये यशस्वीनी घोरपडे आणि काव्या बास्कर यांचा सामना इजिप्त वन संघाविरुद्ध होता. यशस्वीनी दोन्ही एकेरीत चमक दाखवत तिने फरीदा बॅडवे व हॅना गोडा यांना 3-2 अशा फरकाने पराभूत केले.इंडिया वनच्या सुहाना सैनी आणि अनारग्या मंजुनाथ यांच्यासमोर इंडिया थ्री चे (राधिका सकपाळ आणि हार्दी पटेल) आव्हान होते. त्यांना 3-0 असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामन्यात सुहाना आणि अनारग्या यांनी यशस्वीनी आणि काव्या (इंडिया 2) जोडीला 3-0 असे नमवित सुवर्णपदक मिळवले. इंडिया 2 संघाने रौप्यपदक पटकावले. तर, मुलींच्या ज्युनिअर गटात पाच संघाचा सहभाग होता. भारतीय संघात मनुश्री पाटील आणि स्वस्तिका घोषने ग्रीसच्या मालामातेनिआ पापादिमित्री आणि सीरियाच्या आया अली यांना 3-0 असे पराभूत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)