स्नुकर स्पर्धा : खार जिमखाना संघाचा सलग तिसरा विजय

तेरावी पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्‍यपद 2019 स्पर्धेत गटसाखळी फेरीत खार जिमखाना संघाने अनुक्रमे फायर बॉल व क्‍यू क्‍लब किलर्स या संघांचा पराभव करून सलग तिसरा विजय मिळवला.

पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना येथील बिलियर्डस हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत गटसाखळी फेरीत अ गटात पहिल्या सामन्यात खार जिमखाना संघाने फायर बॉल संघाचा 2-1 असा पराभव केला. सामन्यात खार जिमखानाच्या स्पर्श फेरवानी याने फायर बॉल संघाच्या नितीन भोसलेचा 42-06, 69-16, 57-12 असा तर, खार जिमखानाच्या रिषभ ठक्करने पियुश लिंबाडचा 39-15, 62-16, 52-22 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.

खार जिमखानाच्या ईशप्रित चड्डा सामन्यास उपस्थित राहू न शकल्यामुळे फायर बॉलच्या अमेय काळेकरला पुढे चाल देण्यात आली. ब गटात विग्नेश संघवी, दिनेश महाटनी, सुरज राठी यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पूना क्‍लब अ संघाने डेक्कन रुकीज संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून शानदार सुरुवात केली.

ड गटात क्‍यू क्‍लब वॉरियर्स संघाने एसआरके मास्टर्स संघाचा 2-1 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला. विजयी संघाकडून अल्तमेश सैफी, शाहबाज खान यांनी सुरेख कामगिरी केली. फ गटात आकाश पाडाळीकर, सतीश कराड यांच्या अफलातून कामगिरीच्या जोरावर क्‍यू मास्टर्स अ संघाने डेक्कन प्रोफेशनल्स संघाचा 2-1असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. इ गटाच्या लढतीत डेक्कन रायनोज संघाने ठाणे टायगर्सला 2-1 असे पराभूत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)