दुसऱ्या विजेतेपदावर सायना नेहवालचे लक्ष्य

ऑकलॅंड – भारताची फुलराणी सायना नेहवालचे यंदाच्या वर्षातील दुस-या न्यूझिलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्यावर असणार आहे. या स्पर्धेत दुसरे मानांकन असलेल्या सायनाची पहिली लढत चीनच्या वांग झी हिच्याशी होणार आहे. ही स्पर्धा मंगळवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत सायनाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले होते.

जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या सायनाने यंदाच्या वर्षात फक्‍त इंडोनशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. आता आणखी एक विजेतेपद जिंकण्याचा निर्धार सायना नेहवालने व्यक्‍त केला आहे. या स्पर्धेतून पी. व्ही. सिंधूने माघार घेतली असल्याने सायनाकडून अपेक्षा उंचाविल्या आहेत. याशिवाय भारताची अनुरा प्रभुदेसाई सहभागी होत असून तिचा सामना सहाव्या मानांकित ली झुरेई हिच्याशी होणार आहे.

पुरुष एकेरीत साई प्रणीत, एच. एस. प्रणॉय आणि शुुंभकर डे यांनी मुख्य फेरीत थेट प्रवेश केला आहे. तर अजय जयराम, पारुपल्ली कश्‍यप आणि लक्ष्य सेन यांना मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. तसेच पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी. सुमित रेड्डी, तर महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा आणि एन. सिक्‍की रेड्डी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)