#IPL2019 : रसेलने सामन्याचे चित्र बदलले- हॅसोन

कोलकाता -किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक माईक हॅसोन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की, आंद्रे रसेलने सामना कोलकाताच्या बाजूने फिरवला. या सामन्यात रसेल तीन धावांवर बाद झाला होता; परंतु 30 यार्डच्या वर्तुळात चार ऐवजी तीनच क्षेत्ररक्षक असल्याने तो नोबॉल ठरवण्यात आला आणि रसेलला नाबाद ठरवले गेले. त्यानंतर त्याने लागोपाठ आठ वेळा चेंडू सिमापार पाठवत कोलकाताला ईडन गार्डन मैदानावर विक्रमी 218 धावा उभारून दिल्या.

हॅसोन म्हणाले, आम्ही रसेलसाठी वेगळी रणनीती आखली होती, त्याला 17 व्या षटकांत बादही केले होते. पण मैदानात क्षेत्ररक्षणात झालेली चूक महागात पडली. त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजांनी रणनीतीनुसार गोलंदाजी केली होती; परंतु त्यानंतर प्रतिभावन रसेलने 19 चेंडूत नाबाद 49 धावांची तडाखेबंद खेळी करत कोलकाताला मोठी धावसंख्या उभारून दिली. शेवटच्या काही षटकांत आम्ही धावा रोखू शकलो नाही. कोलकाताच्या फलंदाजांनी त्या षटकांत 22-24 धावा फाटकाविल्या. तो क्षण सामन्याला कलाटणी देणारा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)