पुणे सिटीकडून जमशेदपूरचा धक्कादायक पराभव

जमशेदपूर – हीरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) पाचव्या मोसमात बाद फेरी गाठण्याच्या जमशेदपूर एफसीच्या आशांना मोठा हादरा बसला आहे. येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलाच्या मैदानावर यजमान जमशेदपूरला 1-4 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. रॉबिन सिंगने दोन, तर मार्सेलिनीयो आणि प्रतिभाशाली आशिक कुरुनीयन यांनी प्रत्येकी एका गोलसह पुण्याचा दणदणीत विजय साकार केला. जमशेदपूरला घरच्या मैदानावर असंख्य संधी दवडण्याचा फटका बसला.

खाते उघडण्याची शर्यत पुणे सिटीने जिंकली. दिएगो कार्लोसने बॉक्‍समधून उजवीकडे मारलेला चेंडू अडविताना जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल सफाई दाखवू शकला नाही. त्यामुळे चेंडू इयन ह्युम याच्यापाशी गेला. ह्यूमने मारलेला चेंडू गोलपोस्टला लागून रॉबीन सिंग याच्याकडे गेला. रॉबिनने मग मोकळ्या नेटमध्ये चेंडू घालविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पूर्वार्धातील अखेरच्या मिनिटाला उजवीकडून ह्युमने चाल रचत मध्य रेषेपर्यंत मुसंडी मारली. मार्सेलिनीयोने त्याच्या पासमुळे चेंडूवर ताबा मिळविला. सुब्रत पुढे सरसावला, पण चेंडू त्याचा हाताला लागला. मार्सेलिनीयोने कौशल्याच्या जोरावर त्याला हुलकावणी देत चेंडू नेटमध्ये मारत गोल नोंदविला. दुसऱ्या सत्रातील पुणे सिटीच्या दोन गोलांमध्ये आशिकचा मोलाचा वाटा होता. 65व्या मिनिटाला त्याने डावीकडून चाल रचत रॉबिनला पास दिला. रॉबीनने मारलेला चेंडू सुब्रतच्या बाजूने नेटमध्ये गेला. पाच मिनिटांनी आशिकने गोल नोंदविताना मार्सेलिनीयोची चाल फलदायी ठरविली.

जमशेदपूरला 76व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. कॅल्वोने मारलेल्या चेंडूवर पुणे सिटीचा मार्टिन डियाझ आणि जमशेदपूरचा सुमित पासी या दोघांनी बॉक्‍समध्ये उडी घेतली. त्यात मार्टिनच्या हाताला चेंडू लागला. त्यामुळे पंच आर. व्यंकटेश यांनी जमशेदपूरला पेनल्टी बहाल केली. ही पेनल्टी घेताना कॅल्वोने पुणे सिटीचा गोलरक्षक कमलजीत सिंग याला चकविले. जमशेदपूरने दुसऱ्याच मिनिटाला प्रयत्न केला, पण मारीओ आर्क्वेसने जास्त अंतरावरून केलेला प्रयत्न स्वैर होता.

दिएगोने आठव्या मिनिटाला उजवीकडून आगेकूच केली. त्याला आगुस्टीन फर्नांडीसने रोखले, पण चेंडू ह्यूमपाशी गेला. ह्युमच्या प्रयत्नावर टिरीने ब्लॉकींग करीत जमशेदपूरचे नेट सुरक्षित राखले. 11व्या मिनिटाला कॅल्वोने आणखी एका कॉर्नरवर उजवीकडून फटका मारला. त्यावर आर्क्वेसने हेडींगकेले, पण पुणे सिटीच्या मार्को स्टॅन्कोविचने हेडींगवर चेंडू ब्लॉक केला. जमशेदपूरचा आणखी एक प्रयत्न 13व्या मिनिटाला फसला. फारुखने उजवीकडून आर्स्वेसकडे फटका मारला. आर्स्वेसने मारलेला फटका मात्र क्रॉस बारच्या डावीकडे धडकला. या व अशा असंख्य संधी दवडण्याचा फटका जमशेदपूरला सामन्यात बसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)