पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धा : लॅन्सर्स संघाचा सलग दुसरा विजय

पुणे – लॅन्सर्स संघाने एक्‍स्कॅलिबर्स संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अनोख्या व नावीन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मस्किटीयर्स संघाने समुराईज संघाचा 10-9 असा पराभव केला. बॅडमिंटन प्रकारात मस्किटीयर्स संघाने समुराईज संघाचा 4-3 असा पराभव केला. टेबल टेनिस प्रकारात मस्किटीयर्स संघाला समुराईज संघाकडून 3-4 अशी हार पत्करावी लागली मात्र टेनिस प्रकारात मस्किटीयर्स संघाने पुन्हा आघाडी घेत समुराईज संघाचा 3-2 असा पराभव केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या लढतीत लॅन्सर्स संघाने एक्‍स्कॅलिबर्सचा 12-7 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. बॅडमिंटन प्रकारात लॅन्सर्स संघाने एक्‍स्कॅलिबर्स संघाचा 6-1 असा पराभव करत मोठी आघाडी घेतली. टेबलटेनिस प्रकारात लॅन्सर्स्‌ संघाला एक्‍स्कॅलिबर्स संघाकडून 2-5 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, टेनिस प्रकारात लॅन्सर्सने पुन्हा आघाडी घेत एक्‍स्कॅलिबर्स संघाचा 4-1 असा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)