पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत कुकरीज, मस्कीटियर्स संघांचे विजय

पुणे – कुकरीज संघाने समुराईज संघाचा, तर मस्कीटियर्स संघाने किर्पन्स संघाचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अनोख्या व नाविन्यपूर्ण अशा पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग स्पर्धेत आगेकूच नोंदवली आहे.

पीवायसी हिंदू जिमखानाच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुकरीज्‌ संघाने समुराईज्‌ संघाचा 12-7 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

कुकरीज्‌ संघाने सर्व प्रकारात वर्चस्व राखत विजय संपादन केला. बॅडमिंटन प्रकारात कुकरीज्‌ संघाने समुराईज्‌ संघाचा 4-3 असा पराभव करत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात मस्कीटियर्स संघाने किर्रपन्स्‌ संघावर 10-9 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)