वरिष्ठ राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे सोलारीसतर्फे आयोजन

पुणे -पुणे येथे प्रथमच सोलारीस-जीआयएसटीए वरिष्ठ पुरुष आणि महिला राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोलारीस क्‍लब, मयूर कॉलनी येथे दि. 4 ते 7 फेब्रुवारी 2019 या कालावधीत होणार आहे. आपापल्या काळातील राष्ट्रीय विजेते आणि देशातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षक असणाऱ्या दिग्गज्‌ वरिष्ठ खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

तब्बल साडेपाच लाख रुपये पारितोषिक रक्कम असलेल्या या स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्‍लबतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सुमारे 200 खेळाडू सहभागी होणार असून स्पर्धेत पहिल्यांदाच वरिष्ठ महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही स्पर्धा 35 वर्षावरील, 45 वर्षावरील, 55 वर्षावरील, 60, 65 वर्षावरील व 75 वर्षावरील अशा सहा गटांत होणार आहे. ही स्पर्धा एकेरी आणि दुहेरीमध्ये होणार आहे. जीआयएसटीए या संघटनेच्या मान्यतेखाली स्पर्धेचे आयोजन होत असून वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी पुण्यातील युवा खेळाडूंना मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)