स्टॅलियन्स व एसबीएच स्मॅशर्स यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे -साहिल पारख याने केलेल्या नाबाद 61 धावांच्या खेळीमुळे स्टॅलियन्स संघाने बीस्मार्टचा तर एसबीएच स्मॅशर्स संघाने रॉयल्सचा पराभव करून आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखे तर्फे आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड व केस्टो बाईक्‍स सहप्रायोजित सहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला.

कटारिया हायस्कूल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साहिल पारख याने केलेल्या नाबाद 61 धावांच्या खेळीच्या जोरावर स्टॅलियन्स संघाने बिस्मार्टचा 4 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा खेळताना स्टॅलियन्स संघाने 10षटकात 3बाद 91धावा केल्या. यात साहिल पारख नाबाद 61, आयुश तिवारी 17 यांनी धावा केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याच्या उत्तरात बिस्मार्ट संघाला 10 षटकात 4 बाद 87 धावाच करता आल्या. यामध्ये निलेश गुगळे नाबाद 24, ब्रिजभूषण तिवारी 18, सार्थक देडगावकर 15, अमोल चंगेडिया नाबाद 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. सामन्याचा मानकरी साहिल पारख ठरला. दुसऱ्या सामन्यात चंकीत धनुका (26धावा व 2-9)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर एसबीएच स्मॅशर्स संघाने रॉयल्स संघावर 5 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)