औंध फायटर्स संघाला विजेतेपद

पुणे – मुकुंदनगर ब्लास्टर्स संघावर केवळ एका धावेने विजय मिळवत औंध फायटर्स संघाने पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडळ जिल्हा युवा समिती तर्फे आयोजित यशोधन पुणे माहेश्‍वरी प्रीमियर लीग अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली. नेहरू स्टेडियम मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना हा उत्कंठावर्धक आणि अटीतटीचा ठरला.

कमी धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात केवळ 1 धाव ही निर्णायक ठरली. धीरज मंत्री याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर औंध फायटर्स संघाने मुकुंदनगर ब्लास्टर्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले. पहिल्यांदा फलंदाजी करताना औंध फायटर्स 14 षटकात 6 बाद 103 धावा केल्या. यामध्ये धीरज मंत्री याने 28 धावा तर, अखिल तपाडिया याने 26 धावा व रोहित राठी याने 21 धावा करून 103 धावांचे माफक आव्हान उभे केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुकुंदनगर ब्लास्टर्स संघ धावांचा पाठलाग करताना सुरुवात काहीशी खराब झाली. पण त्यानंतर आलेल्या आशिष राठी (40 धावा) व सुशांत (38) यांनी संघाचा डाव सावरला. पण मोक्‍याच्या क्षणी हे फलंदाज बाद झाले आणि संघाचा डाव 14 षटकात 102 धावांवर आटोपला. धीरज मंत्री याने गोलंदाजीमध्ये कमाल करत 28 धावात 2 गडी बाद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)