शिवाजी चषक क्रिकेट स्पर्धा : पुणे विद्यार्थी गृहचा झील कॉलेजवर विजय

पुणे – अद्वैत कुलकर्णीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुणे विद्यार्थी गृहच्या संघाने झील कॉलेजचा पराभव करत येथे सुरू असलेल्या शिवाजी करंडक आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

यावेळी प्रथम फलंदाजी करताना पीव्हीजीच्या संघाने 19 षटकांत 9 बाद 134 धावांची मजल मारत झील कॉलेज समोर विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, प्रत्युत्तरात खेळताना झील कॉलेजच्या संघाला 19 षटकांत 8 बाद 81 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 53 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी 35 धावा आणि एक बळी अशी कामगिरी करणाऱ्या अद्वैत कुलकर्णीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)