युएस किड्‌स गोल्फ इंडिया टूर : कौशल, तन्मय, कनिष्क यांची चमक 

-सहावा टप्पा पुण्यात यशस्वी 

पुणे -यूएस किड्‌स गोल्फ इंडिया टूरच्या पुण्यात झालेल्या सहाव्या टप्प्यात 15 ते 18 वर्षांखालील मुलांच्या गटात कोलकात्याच्या कौशल बग्रोडिया, पुण्याचा तन्मय नेगी आणि कनिष्क लुंगड यांनी चमक दाखवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, 11 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात पुण्याच्या विदीश कर्दभाजने याने 18 होल्स 82 स्ट्रोक्‍समध्ये पूर्ण करुन (10 ओव्हर पार) अव्वल स्थान पटकाविले. तसेच पुण्याचा शमित डाखणे हा 86 स्ट्रोक्‍ससह (14 ओव्हर पार) द्वितीय स्थानावर राहिला.

पूना क्‍लब गोल्फ कोर्सवर ही स्पर्धा झाली. या स्पर्धेल 15 ते 18 वयोगटात कौशलने 18 होल्स 70 स्ट्रोक्‍समध्ये पूर्ण करून 2 अंडर पार स्कोअरसह अव्वल स्थान मिळवले. पुण्याच्या तन्मय नेगी 71 स्ट्रोक्‍ससह (1 अंडर पाससह) दुस-या स्थानावर राहिला, तर कनिष्क लुंगडने 74 स्ट्रोक्‍ससह (2 ओव्हर पार) तिसरे स्थान मिळवले. 15 ते 18 वर्षांखालील मुलींच्या गटात खारघरच्या गौरी क-हाडेने 18 होल्स 79 स्ट्रोक्‍समध्ये पूर्ण करून सेव्हन ओव्हर पार स्कोअर नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)