बुध्दिबळ स्पर्धा : प्रतिक मुळ्येने पटकाविले विजेतेपद 

पुणे – प्रतीक मुळ्ये याने 7 गुणांसह विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट, हिंद शक्‍ती सोशल फाउंडेशन आणि जयंत गोखले चेस इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित कै. प्रल्हाद सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झालेल्या दहाव्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेतील खुल्या गटाचे विजेतेपद पटकावले.

ही स्पर्धा भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळ येथे 26 जानेवारी रोजी झाली. आठव्या व अखेरच्या फेरीत पहिल्या पटावर प्रतीकने रणवीर मोहितेवर मात केली. दुस-या पटावर केवल निर्गुणला चित्तारी वर्माकडून पराभव पत्करावा लागला. यासह प्रतीकचे सात गुणांसह विजेतेपद निश्‍चित झाले. या आठ फे-यांमध्ये प्रतीकला केवळ एकच पराभव पत्करावा लागला. पाचव्या डावात राहुल वर्मा याने त्याला नमविले. चित्तारी वर्मा (6.5) दुस-या, रवी बेहेरे (6.5) तिस-या स्थानावर राहिला. राहुल वर्मा (6) चौथ्या, तर रणवीर मोहिते (6) पाचव्या स्थानावर राहिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेतील प्रौढ गटात लक्ष्मण खुडे (4.5), महिलांमध्ये रिया मराठे (5), 16 वर्षांखालील गटात केवल निर्गुण (6), 12 वर्षांखालील गटात अर्णव नानल (5.5), 8 वर्षांखालील गटात अलौकिक सिन्हा (4) यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम अशी पारितोषिके प्रदान करण्यात आली. पारितोषिक वितरणप्रसंगी नगरसेवक मुरलीधर मोहोळ, सिनेअभिनेते रमेश परदेशी, महाराष्ट्रीय मंडळाचे धनंजय दामले, अभिजीत मोडक, सुनील पांडे, भूषण मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)