पराभवाचा सकारत्मकतेने विचार करणार- नदाल

मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यावर राफेल नादालने सांगितले की, मी या पराभवाचा सकारात्मकतेने विचार करत असून पुढील स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित आहे. सप्टेंबर 2018मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपान्त्यसामन्यातून दुखापतीमुळे नदालने माघार घेतली होती.

त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमन करताना त्याने अंतिम सामन्यापर्यंत एकही सेट गमावाला नव्हता. परंतु अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचने त्याला 6-3, 6-2 आणि 6-3 असे सहज पराभूत केले. नदाल म्हणाला, हा दिवस माझा नव्हता. परंतु, जोकोविचने माझ्यापेक्षा चांगला खेळ केला हे मान्य करावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तरी मी दुखापतीमधून सावरत अंतिम फेरीत प्रवेश केल्याने समाधानी आहे. मागील दोन आठवड्यात मी जबरदस्त खेळ केला होता. त्यामुळे माझ्यामध्ये ऊर्जा संचारली असून पुढील स्पर्धांमध्ये विजेतेपदे जिंकण्यासाठी मी प्रेरित झालो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)