फेडरर चांगल्या टेनिसपटू सोबत चांगला माणूस -विराट

माऊंट मोंगानुई -भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला रॉजर फेडररला भेटून कसे वाटले, असे विचारले असता विराट म्हणाला, रॉजर फेडरर एक चांगला टेनिसपटू तर आहेच सोबत तो एक चांगला माणूस देखील आहे. तसेच तो माझा आवडता टेनिसपटू असून त्याला भेटून मला खूप आनंद झाला. माझ्यासाठी तो खूप सुंदर क्षण होता.

दरम्यान विराट आणि अनुष्का शर्मा यांनी ऑस्ट्रेलिया येथिल एकदिवसीय मालिका संपल्यानंतर न्युझीलंड विरुद्धची मालिका सुरू होण्यापुर्वी ऑस्ट्रेलिया ओपनचे सामने पाहिले होते त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर याची भेट घेतली. तसेच टेनिसमध्ये पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत पाहिल्यास्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि महिलांच्या क्रमवारीत माजी अव्वल खेळाडू सेरेना विलियम्स यांचे सामने पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)