ओम साई आणि शिवशक्ती संघांना विजेतेपदाचा मान

पुणे महपौर चषक कबड्डी स्पर्धा

पुणे  – पुरूष विभागात ओम साई चिखली (पुणे) तर महिला विभागात शिवशक्ती मुंबई या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाम्चा पराभव करुन येथे सुरू असलेल्या पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले.

पुणे विमाननगर येथील सिंम्बॉयसिस क्रीडांगणा वर सुरू असलेल्या पुणे महानगर पालिका आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने मुख्य संयोजक क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारे यांनी आयोजित केलेल्या पुणे महापौर चषक कबड्डी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी पुरूष विभागात अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात चिखलीच्या ओम साई संघाने नंदूरबारच्या एनटीपीसी संघावर 39-33 अशी मात करून महापौर चषक पटकावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मध्यंतराला 10- 21 असा पिछाडीवर असलेल्या ओम साई संघाच्या सुनिल सिध्दगवळी व राकेशकुमार यांनी केलेल्या चौफेर चढाया व केलेला आक्रमक खेळामुळे मध्यंतरानंतर 3 बोनस, एक तांत्रिक गुण व दोन लोन लावत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर एमटीपीसी संघाचा बचाव खिळखिळा करीत विजय मिळविला.एनटीपीसी संघाने सामन्याच्या पुर्वाधात पहिल्या पाचच मिनिटात ओम साई संघावर लोन लावला. यामध्ये सुरज देसाई व दादा आवाड यांचा मोलाचा वाटा होता. मात्र मध्यंतरानंतर त्यांची जादू चालली नाही व पराभवाला सामोरे जावे लागले.

महिला विभागात अत्यंत तुल्यबळ झालेल्या लढतीत मुंबईच्या शिवशक्ती संघाने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघावर आपेक्षा टाकळे व सोनाली शिंगटे यांनी आपल्या अनुभवाच्या व कौशल्याच्या जोरावर हा सामना जिंकला. मध्यंतराला दोन्ह संघ 14-14 अशा समान गुणांवर होता.

मध्यंतरानंतर सोनाली शिंगटे व आपेक्षा टाकळे यांनी राजमाता जिजाऊ संघाच्या स्नेहल शिंदे व सायली केरीपाळे यांचे आक्रमण सहज परतवून लावले. दोन्ही संघात मातब्बर खेळाडूंचा भरणा होता. त्यामुळे हा सामना दोलायमान होत होता. मध्यंतरापुर्वी दोन्ही संघानी एकमेकांवर एकएक लोन लावला होता. मध्यंतरानंतर मात्र दोन्ही संघानी सावध खेळ केला. यात शिवशक्ती संघाची सरशी झाली व विजय मिळवित महापौर चषक पटकाविला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण खासदार संजय काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा समितीचे अध्यंक्ष व स्पर्धा मुख्य आयोजक राहुल भंडारे, नगरसेवक प्रवीण भोरे, सुंदरा चित्रपटातील अभिनेता श्रीकांत पाटील, अभिनेत्री आश्विनी भांडे, दिग्दर्शक सनी गवळी, अभिनेता आनंद ठोकळ, क्रीडा उपायुक्त किशोरी शिंदे, उद्योजक रमेश आढाव, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे, मधुकर नलावडे, स्पर्धा निरिक्षक उत्तमराव माने, पंच प्रमुख राजेंद्र आंदेकर व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू – पुरुष – सुनिल सिध्दगवळी(ओम साई), महिला- रेखा सावंत (राजमाता जिजाऊ), उत्कृष्ट पकड – पुरूष- सौरभ कुलकर्णी (इस्लामपूर व्यायामशाळा, महिला -स्नेहल शिंदे, उत्कृष्ट पकड- पुरूष- दादा आवाड, महिला ईश्वरी कोंढाळकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)