सीए सुपरकिंग्स, किर्तने अँड पंडित, बीस्मार्ट संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

सहावी अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग स्पर्धा

पुणे – सीए सुपरकिंग्स, किर्तने अँड पंडित, पी अँड एस इलेव्हन, बीस्मार्ट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून येथे सुरू असलेल्या आयसीएआयच्या पश्‍चिम विभागीय पुणे शाखे तर्फे आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड व केस्टो बाईक्‍स यांच्या तर्फे सहप्रायोजित सहाव्या अमनोरा सीए आंतर फर्म क्रिकेट लीग 2019 स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कटारिया हायस्कुल क्रिकेट मैदान, मुकुंदनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रवीण नलावडे(36 धावा व 3-6)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सीए सुपरकिंग्स संघाने प्रास इलेव्हनचा 46धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना प्रवीण नलावडे 36, दशरथ बच्चे 14, भूषण जगताप 13, किरण गारगोटी नाबाद 11 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर सीए सुपरकिंग्स संघाने 8षटकात 4बाद 103धावा केल्या.

याच्या उत्तरात प्रास इलेव्हन संघाला 8षटकात 7बाद 60धावापर्यंतच मजल मारता आली. यात लोहित तनेजाने सर्वाधिक 20 धावा केल्या. सीए सुपरकिंग्सकडून प्रवीण नलावडे(3-6), भूषण जगताप(2-14), दशरथ बच्चे(2-22)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात गिरीश धनंजय याच्या नाबाद 47 धावांच्या खेळीच्या जोरावर किर्तने अँड पंडित संघाने एसआरपीए इलेव्हनचा 10 गडी राखून विजय मिळवला.

अन्य लढतीत पीएचएम टायगर्स संघाने फिनप्रो ऍक्‍सेसचा 39 धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. शिवम नाळे(3-11)याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पी अँड एस इलेव्हन संघाने सीए चॅलेंजर्सचा 10 गडी राखून पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)