हरियाणा हॅमर्सची विजयी मालिका खंडीत

ग्रेटर नोएडा  -विनेश फोगटच्या मुंबई मराठी संघाने हरियाणा हॅमर्सला प्रो रेसलिंग लीगच्या 4 थ्या पर्वामध्ये 4-3 असे पराभूत करत त्यांची विजयी मालिका खंडीत केली. हे सामने ग्रेटर नोएडाच्या गौतम बुद्ध विद्यापीठातील इनडोअर मैदानात होत आहेत.

क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित लॉरेस पुरस्कारासाठी मानांकन मिळालेल्या आणि अशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवलेल्या विनेशला हरियाणाची कुस्तीपटू सीमाने सुरुवातीला चांगलीच झुंज दिली. परंतु, नंतर अनुभवाच्या जोरावर सामना एकतर्फी करत विनेशने सामन्यात 12-2 असे गुण मिळवले आणि निर्धारित वेळ पूर्ण होण्यापूर्वीच सामना जिंकला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, पुरुषांच्या 57 किलो वजनी गटाच्या सामन्यात 23 वर्षांखालील युरोपियन जगज्जेता हरियाणा हॅमर्सचा इब्राहिमल लासोवला मुंबई मराठीच्या रवि कुमारने पराभवाची चव चाखायला लवली. सुरुवातीला इब्राहिमकडे 9-5 अशी आघाडी होती. त्यानंतर रवि कुमारने आक्रमक खेळ करत विजय संपादित केला.

दरम्यान, मुंबई मराठी संघाच्या हरपालने रजनीशचा 5-2 असा पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली. तर 62 किलो वजनी गटात युरोपियन कांस्यपदक विजेता कुस्तीपटू तत्याना ओमेलचेन्कोने मराठी संघाच्या शिल्पी यादवला 16-0 अशा गुण फरकाने एकतर्फी नमवीत हरियाणा संघाला विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)