सायनाची उपान्त्य फेरीत धडक

File photo

श्रीकांत आणि सिंधूचे आव्हान संपुष्टात

जकार्ता  -भारताच्या सायना नेहवालने येथे होता असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली असून पुरुष एकेरीत भारताच्या किदंबी श्रीकांत आणि पी.व्ही.सिंधूचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले आहे. सायनाने थायलंडच्या चोचुवांग पोर्नपावीचा 21-7, 21-18 असा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सायनाने उपान्त्यपूर्व फेरीतील सामन्यामधील पहिला गेम 21-7 अशा मोठ्या फरकाने एकतर्फी आपल्या नावे केला. मात्र, दुसऱ्या गेमध्ये पोर्नपावीने आपला खेळ उंचावत सायनाचा कडवा प्रतिकार केला. मात्र, अखेर सायनाने दुसरा गेम 21-18 असा संघर्षपूर्ण जिंकला.

या विजयाबरोबर सायना इंडोनेशिया मास्टर स्पर्धेत सेमीफायनलमध्ये पोहचली आहे. तर, पी.व्ही.सिंधूचा कॅरोलिना मरिनने 21-11, 21-12 असा एकतर्फी पराभव केला. तर, पुरुष एकेरीत इंडोनेशियाच्या जोनातन ख्रिस्तेने किदंबी श्रीकांतचा 21-18, 21-19 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)