महाराष्ट्रीय मंडळातर्फे आजपासून बॅडमिंटन स्पर्धा

पुणे – महाराष्ट्रीय मंडळातर्फे हौशी खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जोशीज बॅडमिंटन क्‍लब, देवधर बॅडमिंटन ऍकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होणाऱ्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे.

3 फेब्रुवारीपर्यंत चालणारी ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर सभागृहात होणार आहे. स्पर्धेबाबद माहिती देताना महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले म्हणाले, या स्पर्धेसाठी 900हून अधिक प्रवेशिका आल्या आहेत. या स्पर्धेत 11, 13, 15, 17 वर्षांच्या मुले-मुली, पुरुष व महिला एकेरी-दुहेरी, 40 वर्षांवरील पुरुष दुहेरी अशा गटांत ही स्पर्धा होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धा दररोज सकाळी 8 ते रात्री 10 या वेळात होईल. स्पर्धेसाठी रोख, तसेच आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेचे अंतिम सामने 3 फेब्रुवारी रोजी होतील व त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ होईल. स्पर्धेसाठी हेमंत खाडिलकर हे प्रमुख पंच म्हणून काम पहात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)