मुकुंदनगर ब्लास्टर्स, औंध फायटर्स यांची आगेकूच

पुणे – मुकुंदनगर ब्लास्टर्स, औंध फायटर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून येथे सुरु असलेल्या पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगति मंडळ जिल्हा युवा समिती तर्फे आयोजित “यशोधन पुणे माहेश्‍वरी प्रीमियर लीग अजिंक्‍यपद’ क्रिकेट स्पर्धेत आपली विजयी वाटचाल कायम राखली आहे.

नेहरू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत परीमल हेडा याच्या नाबाद 44 धावांच्या जोरावर मुकूंदनगर ब्लास्टर्स संघाने अभिरूची इलेव्हन संघाचा 8 गडी राखून सहज पराभव करून आपल्या गटातून बाद फेरीकडे वाटचाल केली. अभिरूची संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 6 गडी गमावून 66 धावा जमविल्या. परीमल हेडा (नाबाद 44 धावा) व अमित राठी (17) यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुकूंदनगर ब्लास्टर्सने हे आव्हान 8 षटकात व 2 गडी गमावून पूर्ण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखिल तपाडीया याच्या 44 धावांच्या जोरावर औंध फायटर्स संघाने नारायण पेठ क्रिकेट क्‍लब संघाचा 9 गडी राखून सहज पराभव केला. नारायण पेठ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 8 गडी गमावून 77 धावा केल्या. अखिल तपाडीया (44 धावा) व रोहीत राठी (16) यांच्या फलंदाजीच्या जोरावर औंध फायटर्सने हे आव्हान 8.2 षटकात व 1 गडी गमावून पूर्ण केले.

निखील कलंत्री याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सिंहगड सुपर किंग्ज्ने कसबा पेठ रेंजर्सचा 8 धावांनी पराभव करून आगेकूच केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना सिंहगड संघाने 12 षटकात 7 गडी गमावून 119 धावा चोपल्या. निखील कलंत्री याने 54 धावांची खेळी केली. तर, कसबा पेठ रेंजर्सने 12 षटकांत 4 गडी गमावून 111 धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)