राणिंदर सिंग ठरले पहिले भारतीय

नवी दिल्ली – भारताचे माजी नेमबाज आणि अखिल भारतीय रायफल असोसिएशनचे अध्यक्ष राणिंदर सिंग यांची आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या उप-अध्यक्षपदी निवड झाली आहे. हे पद भूषवणारे ते पहिले भारतीय देखील ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेमध्ये चार उपअध्यक्ष पदे असतात.

या पदासाठी झालेल्या मतनदानात त्यांना 161 मते मिळाली तर अन्य उप अध्यक्षपदी निवड झालेल्या आयर्लंडच्या केविन किलटी यांना 162, अमेरिकेच्या रॉबर्ट मिचेल यांना 153 तर चीनच्या वांग युफू यांबा 146 मतांसह पुन्हा निवडण्यात आले.

-Ads-

2014 मध्ये म्युनिच येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत त्यांना 25 पैकी 22 मते मिळाल्याने त्यांना या संघटनेचे सद्‌सत्व दिले गेले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)