औंध फायटर्स, खडक चॅलेंजर्स, बिबवेवाडी वॉरीयर्स संघांची आगेकूच

यशोधन पुणे माहेश्‍वरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा

पुणे – औंध फायटर्स, खडक चॅलेंजर्स आणि बिबवेवाडी वॉरीयर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगति मंडळ जिल्हा युवा समिती तर्फे आयोजित यशोधन पुणे माहेश्‍वरी प्रीमियर लीग अजिंक्‍यपद क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेहरू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अखिल तपाडीया याच्या 35 धावांच्या जोरावर औंध फायटर्स संघाने सारडा स्टॅलियन्स्‌ संघाचा 29 धावांनी पराभव करून आगेकूच केली. औंध फायटर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 4 गडी गमावून 118 धावा केल्या. यामध्ये अखिल तपाडीया (35 धावा), रोहीत राठी (26), निशांत सोनी (नाबाद 16) यांनी संघाला शंभर धावांचा टप्पा गाठून दिला. सारडा स्टॅलियन्स्‌ संघाला हे आव्हान पेलवले नाही व त्यांचा डाव 12 षटकात व 89 धावांवर मर्यादित राहीला.

कुणाल जामवांर याच्या नाबाद 68 धावांच्या जोरावर खडक चॅलेंजर्सने अभिरूची इलेव्हन संघाचा 32 धावांनी पराभव केला. खडक चॅलेंजर्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 2 गडी गमावून 113 धावा केल्या. यामध्ये कुणाल जामवांर याने 41 चेंडूत 12 चौकांरांसह नाबाद 68 चोपल्या. अभिरूची इलेव्हन संघाचा डाव 12 षटकात 81 धावांवर मर्यादित राहीला.

सुमित मुंद्रा याच्या 60 धावांच्या जोरावर बिबवेवाडी वॉरीयर्स संघाने नारायण पेठ क्रिकेट क्‍लबचा 7 गडी राखून सहज पराभव केला. नारायण पेठ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 12 षटकात 7 गडी गमावून 95 धावा केल्या. जीवन चांडक याने 55 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. बिबवेवाडी वॉरीयर्स संघाने हे आव्हान 10.3 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. सुमित मुंद्रा (60 धावा) आणि अमर झंवर (20) यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)