प्रतिस्पर्धी खेळाडूंचा आदर करुन खेळणार – पेन

मेलबर्न: मायकेल क्‍लार्कने संघाच्या नव्या विचारसरणी व खेळण्याच्या पद्धतीवर टीका केल्यानंतर उद्भवलेल्या वादविदात संघाचा कर्णधार टिम पेनने उडी घेतली असून तो म्हणाला आहे की, आम्ही कोणाचाही आदर मिळवण्यासाठी किंवा चाहत्यांना आमचा खेळ व स्वभाव आवडावा म्हणुन आम्ही खेळत नाही.

क्रिकेट हा “सभ्य गृहस्थांचा खेळ’ असून यामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा आदर केल्यास तुमची प्रतिष्ठा कमी होणार नाही.आम्ही ऑस्ट्रेलियन पद्धतीनेच खेळ खेळत आलो आहोत व यापुढेही अशाच प्रकारचा खेळ करू. त्यामुळे इतर कोणतीही व्यक्ती काय मत व्यक्त करते, याविषयी आम्हाला काहीही देणेघेणे नाही, असेही पेनने सांगितले.

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाने सामन्यापूर्वी व सामन्यानंतरदेखील संघातील सर्व खेळाडूंशी हात मिळवण्याची नवी प्रथा सुरू केली, त्यावरून क्‍लार्कने टीका केली असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)