आंतरमहाविद्यालयीन शिअरफोर्स लीग : पीव्हीपीसीओए, असद संघांचे विजय 

पुणे – पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर (पीव्हीपीसीओए), आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर (असद) या संघांनी शिअरफोर्स क्रीडा स्पधेर्तील फुटबॉलमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.

मुलांच्या गटात पीव्हीपीसीओए संघाने इंदिरा संघावर 2-0ने मात केली. यात पीव्हीपीसीओए संघाकडून अनिराग बावसर (8 मि.), आदित्य भोळे (15 मि.) यांनी गोल केले. इतर लढतीत आकुर्डीच्या डी. वाय. पाटील कॉलेज आणि चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटी (सीटीईएस) कॉलेज यांच्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत सुटली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डी. वाय. पाटील कॉलेजकडून सौरभने (2 मि.), तर सीटीईएस कॉलेजकडून मननने (20 मि.) गोल केला. यानंतर अलाना कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर (एसीओए) संघाने सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर (एससीओए) संघावर 1-0ने मात केली. यात इब्राहिमने 13 व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. मिनर्व्हा आणि ब्रिक्‍स स्कूल ऑफ आर्किटेक्‍टर (बीएसओए) यांच्यातील लढतही 1-1 अशी बरोबरीत सुटली. मिनर्व्हा संघाकडून आकाश भवनकर (15 मि.) आणि बीएसओए संघाकडून वत्सलसिंगने (9 मि.) गोल केला.

मुलींच्या गटात आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर (असद) संघाने पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर (पीव्हीपीसीओए) संघावर 2-0ने मात केली. यात असद संघाकडून स्नेहल जगताप (3 मि.) आणि मीता व्हघेर्से यांनी गोल केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)