‘त्या’ वादावरून कार्यकारिणीत मतभेद

नवी दिल्ली – हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या वादग्रस्त विधानांमुळे झालेल्या वादानंतर आता त्यांच्यावरील चौकशी बाबतीतही बीसीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीमध्ये एकमत नसल्याचे समोर आले आहे. समितीचे सचिव विनोद राय यांच्यामते या दोन खेळाडूंवरील चौकशी लवकरात लवकर पूर्ण व्हावी तर अन्य सदस्य डायना एडुल्जी यांना या वादावर पडदा टाकण्याचे काम होणार तर नाही ना याची भीती सतावत आहे.

दरम्यान, चौकशी होणार असून जोपर्यंत चौकाशी पूर्ण होत नाही तोपर्यंत या दोन खेळाडूंवर बंदी घालण्यात आली असून ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातूनही माघारी परतले आहेत.

एडुल्जी यांच्या एका ईमेलनुसार, बीसीसीआयचे सचिव राहुल जोहरी यांच्यावर अगोदरच एक लैंगिक अत्याचाराची केस चालू आहे. त्यातच या खेळाडूंनी महिलांच्या भावना दुखावल्या जातील असे विधाने केली आहे. त्यामुळे बीसीसीची प्रतिमा डागाळली जाऊ नये म्हणून या वादावर पडदा टाकला वाजवू शकतो. सचिव राय हे भारतीय संघाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या अगोदर या प्रकरणाची चौकशी पूर्ण व्ह्यावी. कारण हे खेळाडू संघाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यांच्या चौकशीला विलंब केला तर भारतीय संघावर याचा परिणाम होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)