टीसीएस संघाचा विजय

पुणे – टिएटो आणि टीसीएस संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत येथे सुरू असलेल्या प्रथम स्पोर्टस आयोजित पुणे आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली. पिंपरी-चिंचवड येथील व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट ऍकॅडमीच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत टीएटो संघाने सीबीएसएल संघावर तीन गडी राखून मात केली.

टिएटो संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या सीबीएसएल संघाला 17.2 षटकांत 78 धावांत रोखले. यानंतर टिएटो संघाने विजयी लक्ष्य 16 षटकांत 7 गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. दुसऱ्या लढतीत टीसीएस संघाने ऍटॉस संघावर 35 धावांनी मात केली. यात टीसीएस संघाने प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 161 धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऍटॉस संघाला 9 बाद 126 धावाच करता आल्या. यात सुनील बाबरने तीन, तर राहुल गर्गने दोन गडी बाद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संक्षिप्त धावफलक –

टीसीएस – 20 षटकांत 3 बाद 161 (गौरव भालेराव 46, राहुल गर्ग नाबाद 41, विक्रमजीतसिंग 38, आदित्य नाबाद 21, रितेश पुरुषोत्तमन 1-11, हर्षद तिडके 1-26, विवेक अहुजा 1-22) वि. वि. ऍटॉस – 20 षटकांत 9 बाद 126 (हर्षद तिडके 37, दीपक गोयल नाबाद 20, सुनील बाबर 3-23, राहुल गर्ग 2-22, जगन्नाथ गिड्डीमे 1-9).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)