ऑस्ट्रेलियानेही बांधल्या काळ्या फिती

सिडनी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी सचिन तेंडूलकरचे गुरू आणि पद्म पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्रध्दाजंली म्हणुन काळ्या पट्‌टया बांधून मैदानात प्रवेश केला.

तर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दंडावरही काळ्या पट्ट्या दिसून आल्या. मात्र, त्याचे कारण वेगळे होते. 31 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बिल वॉटसन यांचे निधन झाले. 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही काळ्या फिती दंडावर बांधून मैदानात उतरले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत ट्विट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
3 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)