आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंचे यश

पुणे – कोलकाता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत “पुमसे’ या क्रीडा प्रकारात पुणे येथिल खेळाडूंनी चमकदार कामगिरी करताना यश मिळवले.कोलकाता येथील जिओंग तायक्वांदो अकॅडमी आणि कोरिया तायक्वांदो अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन केले होते.

यामध्ये अन्वी बांगर व अविरल त्रिपाठी यांनी सुवर्णपदक, प्रिया भापकर हिने रौप्यपदक, तर तनिष्क बांगर, आविन पिलाकुडी, सुमेधा साखरे, सिद्धू क्षेत्री, जित मुजूमदार, क्रिश केदगोणी, मानस पसारकर, इशिता बर्नवाल, प्रणव भापकर आणि सारंग सरागे यांनी कांस्यपदक पटकावले.

सांघिक पुमसे प्रकारात तनिषा मुदलियार, प्रीत वांद्रे, मानस पसारकर यांनी नेपाळच्या संघाला पराभूत करीत कांस्यपदक मिळवले. सलग तिसऱ्या वर्षी अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत पदकांची कमाई केली. या

स्पर्धेत भारतासह चीन, जपान, मलेशिया, बांगलादेश, नेपाळ, कोरिया, भूतान, इंडोनेशिया आदी देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. भारताकडून महाराष्ट्र, राजस्थान, येथून स्पर्धक सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)