धोनी चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज – रोहित शर्मा

सिडनी – धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणे हे संघासाठी नेहमी फायद्याचे ठरेल असे माझे वैयक्तिक मत असून तो चौथ्या क्रमांकाचा सुयोग्य फलंदाज आहे, असे वक्तव्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी करणारा भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने केले आहे. यावेळी पुढे बोलताना म्हणाला की, अंबाती रायुडूनेही चौथ्या क्रमांकावर संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.कोहलीने मात्र यापूर्वी वेगळे मत मांडले होते. त्याने चौथ्या क्रमांकासाठी रायुडूच योग्य असल्याचे सांगितले होते.

सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतले 22 वे शतक झळकावले. 133 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्मा मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. रोहित आणि धोनीने चौथ्या गड्यासाठी भागीदारी रचत एकवेळ विजयाच्या आशा जिवंत केल्या होत्या. यामध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक काय विचार करतात ही बाब देखील तितकची महत्वाची आहे. मात्र, माझ्या मते धोनी, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य फलंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर तुम्ही त्याच्या फलंदाजीची आकडेवारी पाहिलीत तर अंदाजे 90 च्या सरासरीने तो धावा काढतो आहे. पहिल्या सामन्यात 3 फलंदाज झटपण माघारी परतल्यामुळे परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी मैदानावर टिकून राहणे गरजेचे होते. मैदानात आल्याआल्या तुम्ही शतकी भागीदारी उभारु शकत नाही. त्यासाठी थोडा वेळ लागतो, पहिल्या काही मिनीटांमध्ये मी देखील संथच खेळत होतो. त्या क्षणी आमच्यापैकी एकही जण बाद झाला असता तर सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला असता. यासाठीच आम्ही सावध फलंदाजी करण्याचा पर्याय निवडताना खेळपट्टीवर टिकून राहण्याकडे कल दिला होता. असे म्हणत रोहितने धोनीच्या फलंदाजीचे समर्थन केले. 15 जानेवारीला भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)