धोनी बाद होणे हा सामन्यातील टर्निंग पॉईंट

सिडनी – सिडनी येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 34 धावांनी विजय मिलवला असून या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या जेह्य रिचर्डसनने महेंद्रसिंग धोनीचा बळी मिळणे हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना तो म्हणाला की, धोनी आम्ही ठरवलेल्या रणनितीनुसार आमच्या जाळ्यात अडकला आणि त्याच्या पायचीतचा निर्णय आमच्या बाजूने गेला हे नशीब होते. एकदिवसीय पदार्पण करणाऱ्या जेसन बेहरेनडॉर्फने डावाच्या 33व्या षटकांत धोनीला पायचीत पकडले. टीव्हीवरील रिप्लेमध्ये हा निर्णय सफाईदार नव्हता असे दिसून आले होते. मात्र, भारताकडे रिव्ह्युअ बाकी नसल्याने भारताला यावर तिसऱ्या पंचाकडे दाद मागता आली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतीय संघ धोनीची विकेट वाचवू शकला असता; पण अंबाती रायुडूच्यावेळी वापरेला रिव्ह्यू वाया गेल्याने भारताकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हते. धोनी आणि रोहित ज्या पद्धतीने खेळपट्टीवर स्थिरावले होते. त्यांचा पवित्रा बघता ते दोघे आमच्या हातून हा सामना खेचून नेणार असेच वाटत होते. मात्र, धोनीला बाद करण्यात आम्हाला यश आले. त्यामुळे रोहित शर्मा आणि उर्वरित फलंदाजांवर दडपण आले होते त्याचा फायदा उचलत आम्ही ठराविक अंतराणे बळी मिळवण्यात यशस्वी ठरलो असेही रिचर्डसनने यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)