मिलेनियम नॅशनल स्कुलला विजेतेपद

पीवायसी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लबच्या वतीने व कुंटे बुद्धिबळ अकादमी यांच्या तर्फे आयोजित पीवायसी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या इयत्तेच्या मुले व मुलींच्या गटात बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुल व मिलेनियम नॅशनल स्कुल यांनी, तर पहिल्या आणि दुसरी इयत्तेच्या मुले व मुलींच्या गटात श्री.श्री रवी शंकर विद्या मंदीर (एसएसआरव्हीएम) या संघांनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीवायसी हिंदू जिमखाना येथील कम्युनिटी सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या इयत्तेच्या मुलांच्या गटात बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुलने 19 गुणांसह विजेतेपद, तर मिलेनियम स्कुलने उपविजेतेपद पटकावले. पाचव्या फेरीत आर्यन राव, आरुष धरणे, लक्ष मारलेचा, आदित्य शिंदेकर, स्वरीत सणस यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुलने ब्लुरीज पब्लिक स्कुलचा 5-0असा पराभव केला.

मुलींच्या गटात मिलेनियम नॅशनल स्कुलने 22 गुणांसह विजेतेपद पटकावले. पाचव्या फेरीत इनया कठियारा, अनवेशा गोपाळे, सानवी गुजर, सई जगताप, स्वरा ताम्हणकर यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर मिलेनियम नॅशनल स्कुलने एसबी पाटील पब्लिक स्कुलचा 4-1असा पराभव केला.

याच गटात बीएनएन दस्तूर प्रायमरी स्कुलने 17 गुणांसह उपविजेतेपद पटकावले. पहिल्या आणि दुसरी इयत्तेच्या मुलांच्या गटात श्री.श्री रवी शंकर विद्या मंदीरने (एसएसआरव्हीएम) 17 गुणांसह विजेतेपद, तर शिक्षण प्रसारक मंडळी टीम 1 संघाने 15 गुणांसह उपविजेतेपद मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)