सिमोना हालेप ऑस्ट्रेलियन ओपनसाठी सज्ज

मेलबर्न – महिलांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली टेनिसपटू सिमोना हालेपने ऑस्ट्रेलियन ओपनसाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की, 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात झालेला पराभव अजूनही सलत आहे. परंतु, यावेळी चांगली कामगिरी करण्याचे माझे ध्येय असून हे ग्रॅंडस्लॅम जिंकण्यासाठी मी सज्ज आहे.

यावेळी हालेप पुढे म्हणाली, मागील वेळेच्या अंतिम सामन्याचा मी विचार करीत नाही. कारण तो खूप दुःखद क्षण होता. परंतु, त्या सामन्याच्या चुकांमधून मला खूप काही शिकायला मिळाले. त्या अनुभवातून धडा घेत मी मोक्‍याच्यावेळी संयमी खेळ करण्याचे शिकले आहे. जागतिक क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाबाबत बोलताना हालेप म्हणाली, मला एकही ग्रॅंडस्लॅम जिंकता आले नव्हते तरी देखेल मी क्रमवारीत पाहिल्या स्थानी पोहचले होते. परंतु, ऑस्ट्रेलियन ओपनमधील परभावनांतर मी फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली, त्यावेळीपासून मला क्रमवारीत पहिल्या स्थानी असण्याचे समाधान आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)