प्रजनेशची ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत धडक

सिडनी – भारताच्या प्रजनेश गुणेश्‍वरन याने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडाक्‍यात प्रवेश केला असून गेल्या पाच वर्षात ग्रॅंडस्लॅमच्या मुख्य फेरीत खेळणारा तो भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. चेन्नईच्या 29 वर्षीय प्रजनेशने पात्रता फेरीच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात जपानच्या योसूके वाटानुकी याचा 6-7 (5), 6-4, 6-4 असा पराभव करत मुख्य फेरीत स्थान मिळवले.

प्रजनेशला मुख्य फेरीच्या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 39व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेच्या फ्रान्सेस टायफो याच्याशी लढत द्यावी लागेल. पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास, त्याच्यासमोर पाचव्या मानांकित आणि विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या केव्हिन अँडरसनचे आव्हान असेल. पात्रता फेरीचे तीन सामने जिंकून प्रजनेशने 20 लाख रुपयांची रक्कम मिळवली असून मुख्य फेरीत पहिल्या फेरीत पराभूत झाला तरी त्याला किमान 38 लाख रुपये मिळणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीने हा मान पटकावला होता. युकीने 2018 मध्ये चारही ग्रॅंडस्लॅम स्पर्धामध्ये खेळण्याची किमया केली होती. मात्र दुखापतीमुळे त्याच्या उंचावणाऱ्या कारकीर्दीला खीळ बसली. 2013च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत खेळणाऱ्या सोमदेवने आता निवृत्ती पत्करली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)