पिकलबॉल सुपर कप : एकता, स्मॅशर्स अंतिम सामन्यात एकमेकांसमोर

मुंबई – एकता परीवार आणि सुपर स्मॅशर्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करताना येथे सुरु असलेल्या एकता वर्ल्ड पिकलबॉल सुपर कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

खार जिमखाना येथे रविवारी पार पडलेल्या या सामन्यात एकता यांनी गटवार सामन्यात 47 गुणांची कमाई केली. यानंतर त्यांनी डिंक किलर्सला 8-4 अशा फरकाने पहिल्या उपांत्यसामन्यात विजय मिळवला.तर, दुस-या उपांत्यसामन्यात स्मॅशर्सने मिक्‍स्ड पिकल्सवर 8-4 अशा फरकाने विजय नोंदवला.

एकता व डिंक पहिल्या सामन्यानंतर सामना 3-3 असा बरोबरीत होता. यानंतर तेजस महाजन कृष्णा मंत्रीला 2-1 अशा फरकाने नमवित संघाला 5-4 अशी आघाडी मिळवून दिली. मनिष राव व सौमित्र कोरगावकर यांनी एकतासाठी अभिजित मडभवी व विशाल चुग जोडीला 3-0 (11-7, 11-7, 11-8) असे नमविले.

अन्य एका उपांत्यफेरीच्या सामन्यात स्मॅशर्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही त्यांना दुहेरीत भुषण पोतनिस आणि कुलदीप महाजन जोडीला आशुतोष मडभवी व अजय चौधरीकडून 1-2 (8-11, 11-7, 10-11) असे पराभूत व्हावे लागले.पण, महिला नॅशनल चॅम्पियन वृशाली ठाकरेने अंकुर कपाडियासोबत खेळताना मिश्र दुहेरीत अजय चौधरी व अर्पणा चौधरी जोडीला 3-0 असे नमविले.

यानंतर स्मॅशर्स संघाने आपला विजयी फॉर्म कायम ठेवत एकेरी व दुहेरी सामन्यांमध्ये चमक दाखवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्‍चित केले. मिक्‍स्ड पिकल्स संघाने तिस-या स्थानासाठी झालेल्या सामन्यात डिंक किलर्स संघावर 8-3 असा विजय मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)