धोनी ठरला दसहजारी मनसबदार

सिडनी – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक धाव घेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 10000 धावांचा पल्ला पार केला. या सामन्यापुर्वीच धोनीच्या नावावर 10,173 धावा होत्या, परंतु त्यापैकी केवळ 9999 धावा या भारताकडून होत्या. उर्वरित धावा त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना केल्या आहेत. त्याने आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करताना 2007 मध्या आफ्रिका एकादश संघाविरुद्ध 174 धावा केल्या होत्या.

धोनी व्यतिरिक्त भारताकडून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी 10 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे भारताकडून 10 धावा करणारा धोनी पाचवा खेळाडू ठरला आहे. धोनीने 332 सामन्यात 50.11 च्या सरासरीने 10000 धावा केल्या आहेत. यात त्याने 9 शतके आणि 67 अर्धशतके केली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू :

18426 धावा – सचिन तेंडुलकर (463 सामने)

11221 धावा – सौरव गांगुली (308 सामने)

10768 धावा – राहुल द्रविड (340 सामने)

10232 धावा – विराट कोहली (216 सामने)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)