अनिकेत, मोहसीनची विजयी सलामी

पुणे – पुण्याच्या अनिकेत खोमणे, मोहसीन सय्यद, योगिता परदेशी यांनी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व बारामती ऍग्रो कंपनीचे कार्यकारी संचालक रोहित पवार आणि पुणे शहर बॉक्‍सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी कृषीमंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सृजन करंडक 19 वर्षांखालील गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्‍यपद बॉक्‍सिंग स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. भवानी पेठेतील जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे.

स्पर्धेतील 52 किलो मुलांच्या गटातील दुस-या फेरीत पुणे जिल्ह्याच्या अनिकेत खोमणे याने नाशिक जिल्ह्याच्या तुषार जाधववर वर्चस्व राखले. अनिकेत आक्रमक खेळासमोर तुषारचा निभाव लागत नव्हता. म्हणून लगेचच पंचांनी लढत थांबवून अनिकेतला विजयी घोषित केले. यानंतर याच गटात पुणे शहरच्या मोहसीन सय्यद याने सोलापूर जिल्ह्याच्या राष्ट्रपाल गाडेवर गुणांवर मात केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्पर्धेतील 56 किलो मुलांच्या गटात क्रीडापीठच्या प्रणय राऊतने पुणे जिल्ह्याच्या अभिजित कांबळेवर 2-0ने मात केली. या गटात पुणे शहरच्या आकाश गोरखाने सांगली जिल्ह्याच्या अजय सावंतचे आव्हान परतवून लावून आगेकूच केली. स्पर्धेतील 60 किलो मुलांच्या गटात पुणे शहरच्या मुवाजम शेखने पुणे जिल्ह्याच्या रोहन पांडेरेवर 5-0ने विजय मिळवला आणि आगेकूच केली. यानंतर स्पर्धेतील 48किलो मुलींच्या गटातील पहिल्या फेरीत पुणे शहरच्या योगिता परदेशीने वर्धा जिल्ह्याच्या प्रतीक्षा पारछकेवर 5-2 असा सहज विजय मिळवला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)