धनुर्विद्येत वेदांतची चमकदार कामगिरी

पुणे  -पुणे महापौर चषक जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत पिरंगुट येथील राष्ट्रीय खेळाडू वेदांत संजय दुधाणेने तीन कांस्य पदके जिंकून पदकाची हॅटट्रिक साधली. धायरी येथील शेताच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील धर्नुविद्या स्पर्धेत आर्चर्स ऍकॅडमीकडून खेळताना 30 मीटर व 20 मीटर भारतीय शैली धनुष्य प्रकारात तिसरे स्थान संपादन केले. जिल्हातील 123 खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेदांत या प्रकारातील सर्वात लहान वयाचा पदकविजेता खेळाडू ठरला.

गतवर्षी मेप्रो आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत वेदांतने सुवर्ण हॅटट्रिकसह पदकाचा चौकार झळकविला होता. जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वाधिक चुरस भारतीय शैली धनुष्यप्रकारात पहाण्यास मिळाली. 20 मीटर व 30 मीटरचे 12 र्फेया खेळविण्यात आल्या. राष्ट्रीय खेळाडू वेदांत संजय दुधाणे व अनुभवी धर्नुधर आनंद जगताप, अनिकेत काटदरे यांच्यात पहिल्या फेरीपासून स्पर्धा रंगली. 14 वर्षीय आनंदने सुवर्णपदक पटकावले. 11 वर्षीय वेदांतने 594 गुणांची नेमबाजी करीत कांस्यपदकावर नाव कोरले. स्पर्धेत आर्चर्स ऍकॅडमीने सर्वांधिक पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

30 मीटर व 20 मीटर दोन्ही प्रकारात वेदांतने अनुक्रमे 306 व 289 गुणांची लक्षवेधी कामगिरी केली. यापूर्वी मुळशी तालुक्‍यातील कासारअंबोली येथील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या अजिंक्‍य स्पर्धेतील 14 वर्षाखालील गटात वेदांतने पर्दापणातच पदकाची कमाई केली होती. जिल्हास्तरीय स्कूलपिक्‍स स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा तीन सुवर्ण पदकांचा करिश्‍मा वेदांतने घडविला आहे.

गतवर्षी महापौर चषक स्पर्धेतही वेदांतने रौप्यपदक कमवले होते. ऑलिम्पिक रिकर्व्ह व भारतीय शैली या दोन्ही प्रकारात वेदांतने पदके जिंकण्याची किमया घडविली आहे. पुण्यातील गोळवळकर विद्यालयात इयत्ता सहावीत वेदांत शिकत असून तिरंदाजी खेळातील त्याचे हे 40 वे पदक आहे. तो अर्चरस्‌ ऍकॅडमीत रणजीत चामले, ओंकार घाडगे यांच्याकडे प्रशिक्षण घेत असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)