टीम साऊदीकडे न्यूझीलंडचे नेतृत्व

वेलिंग्टन – न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन, ट्रेंट बोल्ट आणि कोलिन डी ग्रॅम यांना श्रीलंकेविरुद्ध पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या टी- 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असल्याने न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद टीम साऊदी कडे सोपवण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने शुक्रवारी केली.

यापूर्वीही काही वेळा साऊदीकडे न्यूझीलंड संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याबाबत तो पुढे म्हणाला, क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारचे नेतृत्व करणे आव्हानाचे काम आहे. या प्रकारात नेहमी विरोधी संघाच्या एक पाऊल पुढे जाऊन निर्णय घ्यावे लागतात.

विरोधी संघाच्या चालींचे अंदाज घेऊन आपली रणनीती आखावी लागते, असेही तो म्हणाला. एकदिवसीय संघात स्थान मिळविणारे मार्टिन गुप्टिल आणि ऑल राऊंडर जिमी निशाम यांनी टी- 20 संघातही जागा मिळवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)