रोईंग अजिंक्‍यपद स्पर्धेला आजपासून सुरुवात

पुणे – महाराष्ट्र रोईंग असोसिएशनच्या वतीने 46 वी राज्यस्तरीय (इनडोअर) रोईंग अजिंक्‍यपद स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. रविवार रोजी आर्मी रोईंग नोड सीएमई दापोडी येथे सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रोईंग असोसिएशनचे सहसचिव संजय वळवी आणि कृष्णानंद हेबळेकर यांनी दिली.

संजय वळवी म्हणाले, स्पर्धेत कमीत कमी 13 ते जास्तीत जास्त 50 वर्षे अशा खुल्या वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. जागतिक रोइंग गव्हर्निंग बॉडी फिसाने अधिकृत क्रीडाप्रकार म्हणून (इनडोअर) रोईंगला मान्यता दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांच्यामार्फत इनडोअर वर्ल्ड रोईंग चॅम्पियनशिप देखील आयोजित केली जाते. राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेतील विजेते पांडिचेरी येथे फेब्रुवारी 2019 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिपसाठी निवड होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)