कसोटीमध्ये परिपक्‍व होण्यास वेळ हवा- कुलदीप

सिडनी  – पुनरागमनानंतर सिडनी कसोटीमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवने तीन बळी मिळवत आपली उपयुक्‍तता सिद्ध केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर पहिला सामना खेळत असलेल्या कुलदीपला स्वतःला एक यशस्वी कसोटी गोलंदाज म्हणून पाहायचे आहे आणि त्यासाठी वेळ लागणार आहे असे त्याचे मत असून कसोटी क्रिकेटमुळे गोलंदाज म्हणून त्याची जडणघडण योग्य प्रकारे होईल याची त्याला खात्री आहे.

लॉर्डस कसोटीनंतर प्रथमच विदेशी भूमीत कसोटी खेळणारा कुलदीप म्हणाला, या सामन्याअगोदर मी खूप नर्व्हस होतो. खरे बोलायचे झाल तर ऑस्ट्रेलियामध्ये गोलंदाजी करायची म्हणून मी माझ्या शैलीत काहीही बदल केला नाही. ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत खेळण्याचा थडा दबाव होता. मी मागील काही वर्षांपासून सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असल्याने कोणत्या परिस्थितीत कशी गोलंदाजी करायची याचा मला अंदाज आहे. परंतु, जास्त कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली नसल्याने या प्रकारात यशस्वी होण्यासाठी मला थोडा अधिक वेळ हवा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढे कुलदीप म्हणाला, सामन्यात खेळण्याच्या अनुभवातून जे शिकायला मिळते त्याची तुलना होऊ शकत नाही. विरोधी फलंदाजाची रणनीती समजून गोलदाजी करायला पुरेसा वेळ या कसोटी प्रकारात मिळतो. एकदिवसीय प्रकरानंतर कसोटी सामने खेळताना दबाव येतो. तुम्हाला तुमची मनसिकता बदलावी लागते त्यासाठी कमीतकमी 10 दिवसांचा वेळ हवा असतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)