शेन वॉर्नची ऑस्ट्रेलियन निवड समितीवर टीका

सिडनी – ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न याने ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर टीका करताना म्हटले की, भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी करण्यात आलेली खेळाडूंची निवड ही, अर्थहीन आणि मूर्खपणाचे आहे. पुढील विश्‍वचषक समोर ठेवून ऑस्ट्रेलियाने कोणत्याही नवख्या खेळाडूला संधी दिली नाही.

निवड समितीने पीटर सिडल, उस्मान ख्वाजा आणि नॅथन लायन यांना एकदिवसीय संघात स्थान दिले आहे. याबबत बोलताना. वॉर्न म्हणाले, मी नुकताच ऑस्ट्रेलियाचा संघ पाहिला. त्यामध्ये काही महत्त्वाचे खेळाडू नव्हते तर काही अनुभवी खेळाडूंची नावे होती. त्यांची निवड या मालिकेपर्यंत मर्यादित राहते. त्यामुळे विश्‍वचषकाच्या महत्त्वाच्या स्प्रॅंर्धेचा विचारही कारण्यात आला नाही असे मला वाटते, असेही वॉर्न पुढे म्हणाला.

मला समाजात नाही की, डी. शॉर्टची संघात कशी निवड झाली नाही. तो सध्या भरात असून तो कामचलाऊ गोलंदाज म्हणूनही उपयोगी ठरेल. त्याने काय चूक केली याचा, मला शोध लागला नाही. तो आणि फिंच संघाला चांगली सलामी देण्यासाठी उत्तम खेळाडू आहेत, जेव्हा तुम्ही संघ निवडता तेव्हा काही खेळाडू त्या मालिकेसाठी फायद्याचे ठरतील असे असायला हवे तर काही खेळाडू आगामी मालिकांच्या दृष्टीने निवडायला हवेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)