अर्जुन कढे, आर्यन गोविस यांना वाईल्डकार्ड प्रदान

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धा

पुणे – एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित पाचव्या 50000 डॉलर + हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेसाठी पुण्याच्या अर्जुन कढे व आर्यन गोविस यांना मुख्य फेरीसाठी वाईल्डकार्ड प्रदान करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 नोव्हेंबर पर्यंत पुणे येथील म्हाळुंगे बालेवाडी संकुलात रंगणार आहे. भारतातील ही चॅलेंजर स्पर्धा जूनी व सातत्याने होत असून सलग पाचव्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धेत सर्व अव्वल भारतीय खेळाडूंसह 20 हुन अधिक देशांतील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पीएमडीटीएचे अध्यक्ष, संयोजन समितीचे अध्यक्ष आणि केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील म्हणाले की, या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय आणि आशियाई खेळाडूंना पुरस्कृत करण्याचे आमचे लक्ष यशस्वी होत असल्याचाही मला आनंद वाटतो.आम्ही सलग पाचव्या वर्षी आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे भारतीय खेळाडूंना आपल्या मानांकनात प्रगती करता येते. तसेच टेनिसमधील त्यांची कारर्किद घडविण्यास या स्पर्धेचा उपयोग होतो, याचा मला विशेष आनंद आहे.

तसेच, गेली चार वर्षे आमच्या या स्पर्धेतील विजेते हे अव्वल 100खेळाडूंच्या क्रमवारीत आगेकूच करत आहेत. त्यामुळे यावर्षीदेखील या स्पर्धेमुळे विजेत्याला अव्वल 100खेळाडूंच्या क्रमवारीत आगेकूच करण्यास मदत होईल, अशी आशा असल्याचे पाटील यांनी सांगितले. यंदाचा कट ऑफ 283 असा असून त्यामुळे ही स्पर्धा या स्तरावर अतिशय चुरशीची होणार आहे. महाराष्ट्राच्या अर्जुन कढे व आर्यन गोविस यांना मुख्य फेरीसाठी वाईल्डकार्ड देण्यात आले आहे.

एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर म्हणाले की, आम्हांला किमान 8 ते 10 भारतीय खेळाडू मुख्य ड्रॉ आणि पात्रता फेरीत खेळणे अपेक्षित आहे आणि या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या खेळाडूंशी घरच्या मैदानावर लढण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत. रामकुमार रामनाथन व प्रजनेश गुन्नेस्वरन यांनी आपल्या क्रमवारीच्या जोरावर मुख्य फेरीत स्थान प्राप्त केले आणि चार भारतीय खेळाडूंना वाईल्डकार्ड प्रदान करण्यात आले आसून याशिवाय दोन ते तिन इतर भारतीय खेळाडू पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करतील अशी आशा आहे. आयोजन सचिव व पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा म्हणाले की, 2019मध्ये होणा-या आगामी टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेची पुर्व तयारी म्हणजे ही स्पर्धा आहे. तसेच या स्पर्धेसाठी आम्ही याच दृष्टिकोनातुन तयारी करत आहोत.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये नरेंद्र सोपल, उमेश माने, शेखर सोनसाळे, अश्विन गिरमे, शितल अय्यर, प्रविण झिटे, जयंत कढे व केपीआयटी ऑफीशियल्स यांचा समावेश आहे. अँड्री कोर्निलोव्ह यांची एटीपी सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नितीन कन्नमवार यांची एटीपी रेफ्री म्हणून निवड करण्यात आली आहे. तर, स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 7200 डॉलर (5,25,000रूपये) व 80 एटीपी गुण, तर उपविजेत्याला 4053 डॉलर (2,95,000रूपये) व 55 एटीपी गुण देण्यात येणार आहेत.

स्पर्धेतील मुख्य फेरीतील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे:

राडू एल्बोट (माल्दोविया,86), रामकुमार रामनाथन(भारत,121), इलियास यमेर (स्वीडन,132), मार्क पॉलमन्स (ऑस्ट्रीया, 137), प्रजनेश गुन्नेस्वरण(भारत,142),जे क्‍लार्क(ग्रेट ब्रिटन, 175), हिरोकी मोरिया(जपान, 187), आंद्रेज मार्टिन(स्लोवाकिया,189).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)