पेन आणि गोलंदाजांमध्ये वाद होता

सिडनी -ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन आणि जलदगती गोलंदाज यांच्यात संघाच्या रणनीतीविषयी काही संभ्रम होता. त्यामुळे पहिला दिवस संपल्यावर झालेल्या संघाच्या बैठकीत वातावरण आक्रमक आणि तापलेले होते, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचे गोलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड साकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारताने 4 बाद 303 धावांपर्यंत मजल मारली होती.ऑस्ट्रेलियाचे जलदगती गोलंदाज जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क पॅट कमिन्स यांना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत साकर म्हणाले, पेनने वेगळी रणनीती अवलंबण्याचे ठरवले होते तर गोलंदाजांना काही वेगळेच करायचे होते. मैदानावरील त्यांच्या देहबोलीतून त्याची जाणीवही होत होती. त्यामुळे सामन्यानंतर झालेल्या बैठकीत आम्ही दिवसांतील खेळावर खूप चर्चा केली, असेही साकार यांनी सांगितले.

पेनकडून प्रशिक्षकाच्या विधानाचे खंडन

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, गोलंदाज आणि त्याच्यात काही वैचारिक मतभेद नाहीत. त्यामुळे गोलंदाजी प्रशिक्षक साकर यांनी केलेल्या विधानाला त्याने विरोध केला. भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 7 बाद 622 धावांवर डाव घोषित केल्यावर टीम पेनने अचानक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्याने सांगितले की, आम्ही जी रणनीती ठरवली होती ती चुकीची ठरली असे नाही. आम्ही दररोज खेळ झाल्यावर चर्चा करतच असतो. आम्हाला नेमके काय करायचे होते याचा आम्हाला पूर्णपणे अंदाज होता. पहिल्या दिवसाच्या खेळातील पहिले सत्र आणि लंच नंतरचा पहिला तास आम्ही निष्प्रभ ठरलो हे मी मान्य करतो. काही वेळा तुम्ही आखलेली रणनीती मैदानात अंमलात असण्यात तुम्ही योग्य ठरता तर कधी नाही. काल आमच्यासोबत असेच झाले, असेही पेन म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)