क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाचा सहज विजय

पुणे – ओम क्रिकेट ऍकॅडमी आणि क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करताना येथे सुरू असलेल्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचा उद्‌घाटनाचा दिवस गाजवला. येथे सुरू असलेल्या महापौर चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ओम क्रिकेट क्‍लबने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 15 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांची मजल मारत रांजणे क्रिकेट ऍकॅडमी समोर विजयासाठी 144 धावांचे आव्हान ठेवले होते.

मात्र, प्रत्युत्तरात खेळणाऱ्या रांजणे ऍकॅडमीला निर्धारित 15 षटकांमध्ये 9 बाद 123 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 20 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी ओम क्रिकेट ऍकॅडमीच्या हरिष सावराने 46 धावा करताना 23 धावांत 3 गडी बाद करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर, दुसऱ्या सामन्यात सीएनएच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 85 धावा करत क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघासमोर विजयासाठी 86 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाने हे आव्हान 11 षटके आणि दोन गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा करत पूर्ण करून सामन्यात विजय मिळवला. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या ऋतुराज विटकरने 41 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)