एकेरीत रोहन घुगे, विवेक सार्वत यांना विजेतेपद

पहिली सुपर 7 स्लॅम हौशी टेनिस लीग स्पर्धा

पुणे – टेनिस नट्‌स आणि गेम ऑन इव्हेंट्‌स तर्फे आयोजित पहिल्या सुपर 7 स्लॅम हौशी टेनिस लीग
स्पर्धेत पुरुष एकेरी गटात रोहन घुगे याने, तर 40 वर्षांवरील गटात विवेक सार्वत या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मगरपट्टा टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत खुल्या पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत रोहन घुगेने अमित शर्माचा 6-1असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. दुहेरी गटात सुमंत पॉलने राजेश मकनीच्या साथीत अमित शर्मा व रातीश ऋतुसरिया यांचा 6-2असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

40 वर्षांवरील एकेरी गटात विवेक सार्वतने कल्पेश मकनीचा 6-4 असा व 40वर्षावरील दुहेरी गटात अमित शर्मा व प्रफुल नागवनी या जोडीने रवी जौकनी व धर्मेश यांचा 6-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्रक व करंडक पारितोषिक देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रशिक्षक अभय शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक सुनिल लुल्ला, सुधीर पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

सविस्तर निकाल

अंतिम फेरी – खुला पुरुष एकेरी गट – रोहन घुगे वि.वि. अमित शर्मा 6-1. पुरुष दुहेरी गट – सुमंत पॉल/राजेश मकनी वि.वि. अमित शर्मा/रातीश ऋतुसरिया 6-2. 40 वर्षांवरील एकेरी गट – विवेक सार्वत वि.वि.कल्पेश मकनी 6-4. 40 वर्षांवरील दुहेरी गट – अमित शर्मा/प्रफुल नागवनी वि.वि. रवी जौकनी/धर्मेश 6-3.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)