रोहन बोपन्ना व दिवीज शरण जोडीचा उपान्त्य फेरीत प्रवेश

पुणे – एमएसएलटीए यांच्या तर्फे आयोजित टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी भारताच्या लिएंडर पेस व मेक्‍सिकोच्या मिगुल एग्नेल रियास या जोडीचा 6-7(4), 6-4, 17-15 असा पराभव करून उपान्त्य फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या झालेल्या लढतीत भारताच्या रोहन बोपन्ना याने दिवीज शरणच्या साथीत भारताच्या लिएंडर पेस व मेक्‍सिकोच्या मिगुल एग्नेल रियास या जोडीचा 6-7(4), 6-4, 17-15 असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. 1 तास 45 मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये दोन्ही जोड्यांनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टायब्रेकमध्ये भारताच्या लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास या जोडीने रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या व आठव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 7-6(4) असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या रोहन बोपन्ना व दिवीज शरण या जोडीने जोरदार कमबॅक करत लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास यांची तिसऱ्या, तर लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास यांनी रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांची चौथ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली.

त्यानंतर रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास यांची पुन्हा सातव्या व नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली.सुपरटायब्रेकमध्ये संघर्षपूर्ण लढतीत रोहन बोपन्ना व दिवीज शरण यांनी आक्रमक व चतुराईने खेळ करत लिएंडर पेस व मिगुल एग्नेल रियास या जोडीवर 17-15 असा जिंकून विजय मिळवला.

तर, एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत 1 तास 45मिनिटे चाललेल्या या सामन्यात क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याने काल मानांकित खेळाडूवर विजय मिळविणाऱ्या लातवियाच्या एर्नेस्ट गुलबीसचा 7-6(5), 7-6(5)असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. बेलारूसच्या स्टीव्ह दार्सिस याने ट्युनेशियाच्या चौथ्या मानांकित मालेक झजेरी याचा 7-5, 6-2असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या सेटमध्ये स्टीव्ह दार्सिसने झजेरीची दुसऱ्या, चौथ्या व बाराव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5अशा फरकाने जिंकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)